विनेश फोगटच्या निर्णयाची तपासणी सुरू, भारताला मिळणार का रौप्य पदक?

विनेश फोगटच्या निर्णयाची तपासणी सुरू, भारताला मिळणार का रौप्य पदक?

विनेश फोगटच्या अपात्रतेबाबतचा निर्णय 13 ऑगस्टपर्यंत थांबवला

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या 50 किलो वजनी गटातील अपात्रतेबाबत आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टाने (CAS) निर्णय 13 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निकाल मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत जाहीर होईल.

विनेश फोगटने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळले, ज्यामुळे तिला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाविरोधात विनेशने CAS कडे याचिका दाखल केली असून, तिचे अपील स्वीकारण्यात आले आहे. केंद्र सरकारने विनेशची बाजू मांडण्यासाठी अॅड. हरीश साळवे यांची नियुक्ती केली आहे.

CAS ने विचारलेले प्रश्न:

  • विनेशला दुसऱ्या दिवशीही वजन मोजण्याच्या नियमाची जाणीव होती का?
  • रौप्य पदकासंदर्भात क्यूबन कुस्तीपटू तुम्हास मदत करेल का?
  • तुम्हाला अपीलचा निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय ठेवायचा आहे?

 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीची माहिती:

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत: 5 कांस्य आणि 1 रौप्य. नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी संघाने रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत. कुस्तीत अमन सेहरावतने कांस्य पदक मिळवले आहे.

विनेशला जागतिक पातळीवर पाठिंबा:

विनेश फोगटला जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. अमेरिकेचा सहावेळा विश्वविजेता कुस्तीपटू जॉर्डन बुरोज आणि जपानचा सुवर्णपदक विजेता रेई हिंगुची यांच्यासह भारतातील नीरज चोप्रा, पी. आर. श्रीजेश, अभिनव बिंद्रा आणि सचिन तेंडुलकर यांनीही विनेशच्या समर्थनार्थ बोलले आहे.

CAS चा कार्यप्रणाली:

‘कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स’ (CAS) ची स्थापना 1984 मध्ये स्वित्झरलँडमध्ये झाली. याची निर्मिती 1896 च्या ऑलिम्पिकच्या वादग्रस्त प्रसंगांनंतर करण्यात आली होती. CAS स्वतंत्रपणे खेळाच्या वादांवर निर्णय घेतो

 

विनेश फोगटच्या निर्णयाची तपासणी सुरू, भारताला मिळणार का रौप्य पदक?

Leave a Comment