Jarange Patil health: मनोज जरांगे पाटील यांची अचानक प्रकृती खालावली

Jarange Patil health

साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एक शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅली दरम्यान एक गंभीर घटना घडली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत बिघडली आहे.

रॅलीत मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना संबोधित करत असताना, अचानक त्यांना भोवळ आली आणि ते व्यासपीठावरून खाली बसले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांना तात्काळ उपचाराची गरज आहे.

साताऱ्यात मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची तब्यत अचानक बिघडल्यामुळे रॅलीमध्ये त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. व्यासपीठावर बोलताना त्यांचा अंग थरथरायला लागला आणि त्यांना उभं राहणेही अवघड झाले. उपस्थितांनी त्यांना आधार दिला, त्यामुळे ते पडले नाहीत.

Jarange Patil health: मनोज जरांगे पाटील यांची अचानक प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीचे मुख्य कारण त्यांच्या दीर्घकाळच्या उपोषणामुळे होऊ शकते. ते अनेक महिन्यांपासून उपोषण करत आहेत आणि सतत दौऱ्यावर आहेत, ज्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, पण ते मराठा आरक्षणासाठी आपला दौरा चालू ठेवणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या दौऱ्यात खंड पडणार असे दिसत नाही, तरीही मराठा कार्यकर्ते त्यांच्या तब्येची चिंता करत आहेत.

Leave a Comment